*ए.पी.जे. अब्दुल कलाम*
*भारताचे एकमेव अद्वितीय व्यक्ती, भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती*
*डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले*
*ए.पी.जे. अब्दुल कलाम*
पूर्ण नावअमीर पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलामजन्म१५ ऑक्टोबर, १९३१
रामेश्वरमृत्यू२७ जुलै, २०१५(वय ८३)
*शिलाँगनागरिकत्वभारतीयराष्ट्रीयत्वभारतीयधर्मइस्लामकार्यसंस्थासंरक्षण संशोधन आणि विकास संस्थाप्रशिक्षणमद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीख्यातीशास्त्रज्ञ, भारताचे माजी* *राष्ट्रपतिपुरस्कारपद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्नवडीलजैनुलाबदिन अब्दुल*
*त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण* *रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले*. *या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले*
*त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला*.
*१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधीपंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले*.
*स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले*.
*वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली*.
*विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत*
*होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत*..
*भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.Year of Award or HonorName of Award or* *HonorAwarding Organization१९८१पद्मभूषणभारत सरकार* [२][३] *१९९०पद्मविभूषणभारत सरकार* [२][३] *१९९७भारतरत्नभारत सरकार* [३][४] *१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत* *सरकार [३]१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत* *सरकार२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[३]२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी[५][६]२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद* *पदवीवॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ, U.K[७]२००८डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग(Honoris Causa)नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी*, *सिंगापूर[८]२००९हूवर पदकASME* *Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स*)[९] *२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings* *पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A[१०]२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू* *विद्यापीठ[११]२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे* *समासदत्व.IEEE[१२]
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.शिक्षण : श्वार्ट्झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल* इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).१९५८ : *डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट-* *ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.१९७९* : *SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट* *डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)१९८१* : *पद्मभूषण पुरस्कार प्राप्त१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त.२००१ : सेवेतून निवृत्त.२००२ : भारताच्या* *राष्ट्रपतीपदावर नेमणूक*.
*कलामांनी लिहिलेली पुस्तके*
अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)इंडिया - माय-ड्रीमउन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशनविंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) *अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक खूप छान आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे*. *परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्याला मत देऊ शकतो हे त्यातून समजते*.
इटर्नल क्वेस्ट : लाइफ अँड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)ए.पी.जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन (मूळ हिंदी, अरुण तिवारी, मराठी अनुवाद ??? )’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य).ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : आर के पूर्ती)ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी)कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (डॉ. शरद कुंटे)रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां.ग. महाजन)वियार्थ्यांचे कलाम (डॉ. स्धीर मोंडकर)
१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व२०१५ सप्टेंबर : बंगालच्या *उपसागरात ओरिसाच्याकिनार्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले*
*ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना* *बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला*.
ए पी जे अब्दुल कलाम(APJ Abdul Kalam)
भारत रत्न ए पी जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धती मुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. ते एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी आपले उभे आयुष वेचले देशासाठी. त्यांनी देशाला स्वतःची मिसाइल टेक्नोलॉजी दिली, आणि भारताला विश्वात वेगळे स्थान मिळवून दिले. ते एक राष्ट्रपति म्हणून करोडों भारतवासीयांना, नेहमी स्वप्न बघायला आणि त्या पूर्ण करायला शिकवत आणि प्रेरित करत. चला तर मग बघूया त्यांचा जबरदस्त प्रेरणादायी असे 40 विचार.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
01.
पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.
02.
सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित)करत आहात.
03.
काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजलवत असतो
04.
अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.
05.
जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते.
06.
आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.
07.
आत्मनिभारते मुळेच आत्मसम्मान मिळत असते याची आपल्याला जाणीव नसते.
08.
यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील.
09.
झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.
10.
आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.
11.
देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते. आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमता ना बाहेर आणायला मदत करत असते.
12.
चला आपले आज आपण येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्या साठी त्याग करू.
13.
जेंव्हा तुमची सही हि ऑटोग्राफ बनते तेंव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.
14.
त्रास हा यशाचा सार आहे.
15.
देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडतात.
16.
विचार हे भांडवल, उदयोग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे.
17.
समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे.
18.
स्वप्ने सत्यात उतरवण्या अगोदर प्रथम त्या तुम्हाला बघावे लागतील
19.
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील.
20.
मी हँडसम (देखणा) व्यक्ती नाहीये पण मी माझे हँड गरजू someone ला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता हि मनात असते तोंडावर नव्हे.
21.
आपल्या सर्वांमध्ये एकसमान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते.
22.
तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला एका मानाने ध्येया कडे समर्पित असायला हवे.
23.
आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. ससर्व भ्रमंड तुमचं मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो.
24.
यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते.
25.
आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कानेच जिंकता येईल.
26.
तुमच्या सहभागा शिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागा सोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही.
27.
यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे.योग्य निर्णय कशे घ्यावे?? अनुभवाने.अनुभव कशे घावे?? चुकीचे निर्णय घेऊन
28.
तुमच्या नौकरी वर प्रेम करा पण कंपनी वर करू नका. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल.
29.
एखाद्याला हरवणे खूप सोप्पे आहे, पण त्याला जिंकणे खूप अवघड असते.
30.
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
31.
इंगजी शब्द end चा अर्थ शेवट नसून तो “Effort Never Dies” म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर NO म्हणजे नाही चा अर्थ “Next Opportunity” असा होत जो नवीन संधी असा होतो.
32.
तुमच्या पहिल्या यशा नंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.
33.
जर तुम्हाला सुर्या सारखं चमकायचे असेल तर प्रथम त्याचा सारखं जाळावे लागेल.
34.
तुमच्या जीवनात कसले हि उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे.
35.
शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
36.
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे.
37.
कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क मला हसवत नाहीत पण आठवणी हसवतात.
38.
या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.
39.
वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते.
40.
आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल
Biography Essay : एपीजे अब्दुल कलाम माहिती
- वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती ह्या सर्व पदांवर कार्य केलेले एक थोर भारतीय म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याच्या सवयीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून प्रसिद्ध झाले. राष्ट्रपती पदाच्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी भारतीयांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले.
Childhood and Early Life : बालपण
- अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ओक्टोंबर, १९३१ रोजी, तामिळनाडू मधील रामेश्वर येथे एका कनिष्ट मध्यमवर्गात झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते.
- त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन अब्दुल होते. वडील यात्रेकरूंना होडीतून नेण्याचे-आणण्याचे काम करीत. लहान वयातच त्यांनी वडिलांचे छत्र हरविले. त्यानंतर त्यांनी वर्तमान पत्रे विकून, तसेच इतर छोटी मोठी कामे करून घरी हातभार लावला.
त्यांचे लहानपण खूप हलाखीत गेले.
Education : शिक्षण
- अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शालेय शिक्षण रामनाथपुरमला झाले. शाळेत असताना त्यांना गणितात विशेष रुची होती. नंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेज मध्ये दाखल झाले.
- त्यांनी भौतिकशास्त्रात बी.एस्सी. पूर्ण केल्यानंतर चेन्नई मधील इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलोजी मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांच्या बहिणीने दागिने गहाण ठवून त्यांना पैसा पुरवला.
- या संस्थेतून एरोनोटीक्स चा डिप्लोमा पूर्ण करून नासा मध्ये एरोस्पेस टेक्नोलोजीचे शिक्षण घेतले. कलाम यांना भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याची आशा होती. ते निवडणूक परीक्षेत नवव्या क्रमांकावर आले परंतु आठच जागा असल्याने त्यांना नाकारले गेले.
Work : कार्य
- १९५८ ते १९६३ मध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी अब्दुल कलाम यांचा संबध आला. तिथे त्यांनी भारतीय सेनेसाठी छोटे हेलीकॉप्टर बनविण्यास सुरुवात केली. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यात सहभागी होऊ लागले. इंदिरा गांधींच्या काळात क्षेपणास्त्र विकासासाठी पुन्हा संरक्षण संशोधन व विकास संस्थेत आले. तेव्हा पासुनच त्यांनी स्वदेशात क्षेपणास्त्र बनविण्याचा ध्यास घेतला. इस्त्रो मध्ये असताना ते सॅटेलाईट लाँन्चींग व्हेईकल ३ प्रकल्पाचे प्रमुख झाले.
- त्यांचा पुढाकार असलेला हा प्रयोग यशस्वी झाला आणि १९८० साली रोहिणी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करू लागला. या प्रकल्पासोबत ते ध्रुवीय सॅटेलाईट लाँन्च व्हेईकल प्रकल्पावरही काम करत होते जो अजूनच जास्त यशस्वी ठरला. साराभाईंनी त्यांची कामगिरी पाहून त्यांचे खूप कौतुक केले. पुढे कलाम साराभाईंचे नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्र’चे ते प्रमुख झाले.
- १९७० मध्ये कलाम यांना क्षेपणास्त्र सामर्थ्य विकासावर कर करण्याची इच्छा होती, ज्याला केंद्रीय मंडळाने नकार दिला परंतु मुख्यमंत्री इंदिरा गांधी यांनी मात्र वॅलीयंट प्रकल्प आणि डेविल प्रकल्पासाठी गुप्त निधी पुरवला. दोन्ही प्रकल्प अयशस्वी ठरले परंतु त्यातूनच पृथ्वी क्षेपणास्त्राची बीजे रोवली गेली.
- त्यांनी नेहमीच वैयक्तिक कामगिरीपेक्षा सर्वांच्या सांघिक कामगिरीला महत्व दिले. ते सहकाऱ्यांना जाणून घेऊन त्यांच्यातील गुणांचा देशाच्या वैद्यानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेत असत. कलामांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर त्यांचे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कौतुक झाले.
- काही काळ त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागारचे कामही केले. देशाच्या सुरक्षेसाठी अनेक प्रभावी योजना आखल्या. संरक्षण मंत्र्याच्या सल्लागाराचे काम करताना अर्जुन हा मेन बॅटल टँक आणि लाईट काँबॅट एअरक्राफ्ट ची निर्मिती केली.
- १० जून, २००२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले. कॉंग्रेस व समाजवादी पक्षाच्या पाठीब्यांमुळे ते राष्टपती झाले. ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते आणि हे पद त्यांनी २५ जुलै, २००२ पासून २५ जुलै २००७ पर्यंत निभावले.
- त्यांनी त्यांच्या जीवन कालावधीत अनेक पुरस्कार मिळवले. १९८१साली पद्मभूषण, १९९०मध्ये पद्मविभूषण आणि १९९८मध्ये भारतातील सर्व्वोच्च पुरस्कार भारतरत्न ही मिळवला. स्वित्झर्लंडनेही त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दाखल घेवून ज्यादिवशी त्यांनी स्वित्झर्लंडला भेट दिली तो दिवस ‘विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला.
Final Years : अखेरचे क्षण
- कलाम यांचे निधन २७ जुलै, २०१५ मध्ये शिलॉंग मध्ये झाले. ‘राहण्यायोग्य पृथ्वी निर्माण करणे’ य विषयावर इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले. बेथनी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतातच नव्हे तर सर्व जगातील विज्ञान प्रेमींवर शोककळा पसरली. कलाम यांनी आपल्या भरीव कामगिरीने, उत्तम बुद्धिमत्तेने आणि विनम्र स्वभावाने देशातील आजच्या व भावी पिढीसाठी उत्तम आदर्श ठेवला आहे. त्यांची कमतरता भारताला सदैव जाणवत राहील.
श्रीमती अहिरे सारिका धोंडू ,
जि.प.प्रा.शा.वळवाडी ,
ता.मालेगाव ,जि,नाशिक .


No comments:
Post a Comment